महिलांचा पाण्यासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:24 IST2019-03-27T22:23:57+5:302019-03-27T22:24:20+5:30

शहरातील पेठवॉर्ड हनुमान मंदिर परिसरातील नळांना पाणी येत नसल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट सरू आहे. ऊन तापल्यानंतर पाण्याची समस्या अजून उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

Women's Water Elgar | महिलांचा पाण्यासाठी एल्गार

महिलांचा पाण्यासाठी एल्गार

ठळक मुद्देभारतीय महिला फेडरेशनची मागणी : पेठवॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत करा

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शहरातील पेठवॉर्ड हनुमान मंदिर परिसरातील नळांना पाणी येत नसल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट सरू आहे. ऊन तापल्यानंतर पाण्याची समस्या अजून उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पेठवॉर्डातील राऊत यांच्या घराजवळ नळ आहे. याच नळातून नागरिक पाणी घेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नळातून गुंडभर पाणीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी, लागत आहे. या भागातील शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना पाण्यासाठी आपली रोजी बुडवावी लागत आहे. पेठवॉर्डातील एक नळ देवून, खासगी नळाची पाइपलाईन दुरूस्ती करावी, अशी मागणी निवकुंदा कोहपरे, रसिका उरकुडे,ज्योती भोयर, संगिता डोईजड, छाया भोयर, नंदा हजारे, दिपाली कुथे, चंदा नवलाखे, उमिला लोनगाडगे, पूजा हजारे, भारती प्रधान यांनी केली.
दरवर्षी जाणवते टंचाई
ब्रह्मपुरीतील पेठवॉर्डात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. याबाबत प्रशासनाला कळविल्यानंतर तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाते. परिणामी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायम स्वरुपी उपयोजना करावी अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Women's Water Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.