एसटी महामंळाने काही महिन्यापूर्वी एसटी चालक भरतीची प्रक्रिया केली. जानेवारी महिन्यात हे प्रशिक्षणही सुरू झाले. मात्र मार्च महिन्यापासून देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. या पार्श्वभूमीवार १९ मार्चपासून हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून एकच महिला उमेदवाराची परीक्षेअंती निवड झाल्याने नागपूर येथे जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू झाले. वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र चालकाचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. वर्षभराचा कालावधी लोटूनही प्रशिक्षणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. प्रशिक्षण सुरू झाले असल्याने अनेकांनी अभ्यास तसेच काहींनी खासगी नोकरी सोडली. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटून प्रशिक्षणाचे काही चिन्ह दिसत नसल्याने निवडीतील महिला चालकांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील केवळ एकच महिला
चंद्रपूर जिल्ह्यात वाहक म्हणून अनेक महिला कार्यरत आहेत. परंतु, महिला चालक प्रशिक्षणासाठी केवळ एकच महिला पात्र ठरली होती. त्यामुळे त्यांचे नागपूर येथे प्रशिक्षण सुरू झाले होते. कोरोनामुळे ते प्रशिक्षण रखडले होते. आता पुन्हा प्रशिक्षण सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती महामंडळाकडून मिळाली.
------
जिल्ह्यातील आगार ४
बसचालक ५८३
बसवाहक ३६७
महिला बसवाहक १४२