स्त्री शक्तीचा सन्मान वर्षभर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST2021-03-14T04:26:21+5:302021-03-14T04:26:21+5:30

चंद्रपूर : स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे. महिला दिनी त्यांचा मोठा गौरव होताना दिसतो. परंतु, ...

Women's power should be respected throughout the year | स्त्री शक्तीचा सन्मान वर्षभर व्हावा

स्त्री शक्तीचा सन्मान वर्षभर व्हावा

चंद्रपूर : स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे. महिला दिनी त्यांचा मोठा गौरव होताना दिसतो. परंतु, केवळ एकाच दिवशी नाही तर वर्षातील ३६५ दिवसही स्त्रियांचा आदर व सन्मान व्हावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व चंद्रपूर शहरच्या वतीने सम्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत सामाजिक, राजकीय क्षेत्रात उलेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कर्तृत्व आणि नेतृत्वाने गरुडझेप घेणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ जि. प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे तसेच क्रीडा क्षेत्रात अल्पवयात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या श्रुती पंढरी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. आसावरी देवतळे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर शहर युवतीच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील, शहर उपाध्यक्ष अश्विनी तलापल्लीवार, शहर उपाध्यक्षा वर्षा बोमनवाडे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Women's power should be respected throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.