सिंदेवाहीत तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST2021-03-10T04:29:16+5:302021-03-10T04:29:16+5:30

सिंदेवाही : तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष सीमाताई सहारे, ...

Women's Day on behalf of Sindevahit Taluka Mahila Congress Committee | सिंदेवाहीत तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला दिन

सिंदेवाहीत तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला दिन

सिंदेवाही : तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष सीमाताई सहारे, शहर अध्यक्ष लक्ष्मीताई पेदूरवार, सिंदेवाही नगरपंचायत अध्यक्ष आशाताई गंडाटे, लोनवाही ग्रामपंचायत सरपंच नेहा समर्थ, पद्मशाली समाज विदर्भ महिला अध्यक्ष रश्मी परसावार, सिंदेवाही तालुका लोकमत सखी मंच संयोजिका शोभाताई खराते, सिंदेवाही नगरपंचायत सदस्य पुष्पाताई मडावी व नंदा बोरकर, लोनवाही ग्रामपंचायत सदस्य मीरा देवईकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी रश्मी परसावार, शोभा खराते व नेहा समर्थ यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी सिंदेवाही तालुका महिला काँग्रेस कमिटीचे सचिव नंदाताई नरसाळे, संघटक लताताई गेडाम, सुनीता आत्राम, छबुताई नागोसे, निमंत्रिता कोकोडे, रूपाताई तांडूरवार, सुनंदाताई कोटगले, वनिता ज्ञानबोनवार, परवीन शेख, निशा मडावी, वैशाली अरमरकर, सरोज रासेकर, प्रियंका सहारे, सुविता राहुड, जया गाजर्लावार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदाताई नरसाळे यांनी केले.

Web Title: Women's Day on behalf of Sindevahit Taluka Mahila Congress Committee