दारू विक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार

By Admin | Updated: June 29, 2014 23:51 IST2014-06-29T23:51:07+5:302014-06-29T23:51:07+5:30

येथे राजरोसपणे अवैधरित्या दारूची विक्री करण्यात येत असल्याने गावातील महिला वर्गांत संतापाची लाट आहे. या अवैध दारूविक्रीला कंटाळलेल्या महिलांनी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून तुर्तास

Women's Alcohol Against Drug Sales | दारू विक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार

दारू विक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार

मारोडा : येथे राजरोसपणे अवैधरित्या दारूची विक्री करण्यात येत असल्याने गावातील महिला वर्गांत संतापाची लाट आहे. या अवैध दारूविक्रीला कंटाळलेल्या महिलांनी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून तुर्तास विक्रेत्यांवर अंकुश मिळविलेला आहे. युवकांच्या सहकार्याने नुकतेच तीन अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मारोडा, उश्राळा, भादुर्णी या परिसरातील गावात अवैध दारूविक्रीला ऊत आला होता. या परिसरापासून अगदी ६ किलोमिटर अंतरावरील मूल पोलीस ठाण्याच्या बाजुला असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू-विक्रेते तयार झाले. त्यामुळे अनेक कुटुंब प्रमुख महिला व पुरुषांनी कमी कष्टाच्या व अधिक नफ्याच्या या बेकायदेशीर व्यवसायाला सुरूवात केली. दुसरीकडे याचे व्यसन शेतकरी वर्ग व सुशिक्षितांना मोठ्या प्रमाणात लागल्याने अनेकांच्या संसारात वितंडवाद सुरू झाला. गावांत वाद वाढू लागले. सध्या कुणाचाही धाक नसलेल्या या गावात व्यसनाचे एवढे प्रमाण वाढले की, ज्येष्ठ नागरिकांना नव्या पिढीची भीती वाटू लागली. अखेर महिलांनी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीला सहकार्याची हमी दिली. गावातून दारूबंदीसाठी जनजागृती करण्यासाठी महिलांनी फेरी काढली.
सरपंच बंडू वाढई, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी मेश्राम, पोलीस पाटील ताराचंद गेडाम यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी महिला समितीचे प्रमुख म्हणून शेंडे व युवक समितीचे प्रमुख म्हणून राम उत्तुरवार यांच्याकडे सूत्र देण्यात आले.
या समित्यांनी दोन दिवसांत मिळेल त्या ठिकाणी दारू गावात आणणाऱ्यांची झडती घेऊन त्यांच्यावर चांगलाच दबाव निर्माण केला आहे. सध्या दोन-तीन जणांना पोलिसांनी पकडले असून गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी तुर्तास दारूविक्री बंद केले आहे. पोलिसांनी पुढेही सहकार्य करावे, अशी महिलांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Women's Alcohol Against Drug Sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.