वाघाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी महिलांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:15+5:30

सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे.

Women refuse to scrub cotton for fear of tigers | वाघाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी महिलांचा नकार

वाघाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी महिलांचा नकार

Next
ठळक मुद्देसाखरवाही, सुमठाना परिसरात वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील साखरवाही, सुमठाना परिसरात गेल्या चार दिवसांपासून वाघ आल्याच्या अफवेने नागरिकांत दहशत पसरली आहे. शेतकऱ्यांमध्ये व कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या महिला कापूस वेचणीसाठी शेतात जाण्यास नकार देत आहेत.
राजुरा तालुक्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष सुरू आहे. वाघाने जंगल सोडून वस्तीत धाव घेतल्याने नागरिकात मोठी दहशत पसरली आहे. साखरवाही, सूमठणा परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे शेतकºयात मोठी दहशत पसरली असून कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील कापूस वेचणीसाठी जायला तयार नाही. या परिसरात मोठया प्रमाणात जंगल असल्याने नेहमी गावालगत वन्यप्राणी येतात. आता चक्क वाघच आल्याने या परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहे. जंगलात झुडुपे मोठया प्रमाणात वाढली आहे. दिवसा येथे वन्यप्राणी राहत असल्याने शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान करण्यात येत आहे. सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. जंगल नष्ट होऊ लागल्याने वन्यप्राणी वस्तीकडे धाव घेत आहे. राजुरा तालुक्यात वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी बाहेरून मजूर आणून कापूस वेचणी करीत आहे. परंतु साखरवाही परिसरात वाघ आल्यामुळे या परिसरात बाहेरून येणाऱ्या महिला कापूस वेचणीसाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Women refuse to scrub cotton for fear of tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ