शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतकरी होणार कापूस खरेदीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकरी यात सहभागी आहेत उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्या जात आहे.

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सावकारी कर्जातून होणारी लुट थांबविण्यासाठी महिला बचत गटांना एकत्र आणून शेतकरी महिलांना कापूस खरेदीदार बनावे व बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनने काही जिनिंगसोबत करार केला. त्यामुळे महिलांनाही कापूस खरेदीदार होता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास खरेदी विक्रीतून दलाली, हमाली, काटा व इतर भाड्यातून सुटका मिळणार आहे.दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकरी यात सहभागी आहेत उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्या जात आहे. अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी आशावादी झाला. परंतु वर्षेभर शेतात मेहनत करायचे व कापूस विक्रीसाठी दलाली, हमाली, काटा व इतर भाडे शेतकºयांनी भरून द्यायचे,असा प्रकार सुरू होता. ही बाब फाऊंडेशनच्या लक्षात आल्याने महिला बचतगटांना एकत्र करून योग्य मार्गदर्शन केले. या मोहिमेमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा आधार मिळाला आहे.कापूस खरेदी ते विक्रीचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षणजिवती तालुक्यातील पहाडावरील महिला बचत गटांना अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या वतीने एकत्र करून कापूस उत्पादन ते विक्री आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कापूस खरेदी व विक्रीसाठी सक्षम करून जवळ असलेले बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामध्ये इंदिरा, एक्सिम सोनुर्ली, वैभव वाईट गोल्ड, पांढरपौणी, गणेश काटन खामोना, एफाज कॉटन, श्री गुरूदेव धोपटाळा, साई जिनींग वेढली, सातासर जिनींग, कापनगाव, पारस अ‍ॅग्रो-वारोरा, प्रकाश वाईट गोल्ड समुद्रपूर आदी जिनिंगसोबत प्रकल्पाचा करार झाला आहे. पहाडावरील महिला शेतकºयांना याबाबत माहिती करून देण्यासाठी इंदिरा एक्जिम सोनुर्ली येथे अभ्यासदौरा काढण्यात आला. यातून महिला शेतकºयांना विविध प्रकारची माहिती मिळाली. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वत: कापूस खरेदी ते विक्री या क्षेत्रात पुढाकार घेऊ शकतात. तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असल्याने अशा मोहिमेची गरज होती.

टॅग्स :agricultureशेती