शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

चालीं-निलींत पाण्यासाठी महिलांची तप्त उन्हात कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:34 IST

कसे होणार? : वर्षभरापासून नळ योजना बंद, बोअरवेलही आटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरात पाण्याची पातळी अत्यंत खाली गेल्याने गावातील विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. चार्ली-निर्ली येथील नळ योजना मागील वर्षभरापासून बंद असल्याने येथील महिलांना रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दंडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

राजुरा तालुक्यात वेकोलीच्या उत्खननामुळे पाण्याची पातळी अत्यंत खोल गेलेली आहे. परिसरातील नाले उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडले असून गावातील विहिरी व बोअरवेलसुद्धा कोरड्या पडल्या आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नळ योजनाही बंद पडल्या आहेत. चार्ली -निली येथील नळ योजना पाण्याच्या स्रोताअभावी मागील वर्षभरापासून बंद पडली आहे. या नळ योजनेकरिता पूर्वी वर्धा नदीवरून पाणी आणले जात होते. परंतु, नदी लांब असल्याने अनेकदा पाइपलाइन लीक होऊन नळ योजना बंद राहत होती. म्हणून गावाजवळील नाल्यावर पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले. परंतु, तेही आटले. त्यानंतर वेकोलीच्या सहकार्याने नळ योजनेकरिता पोवनी येथून पाणी आणण्यात आले. परंतु, महामार्गाच्या कामात पाइपलाइन फुटल्यामुळे नळ योजना वर्षभरापासून बंद पडली आहे.

सध्या नळ योजनेसाठी जल जीवन योजनेतून कढोली शिवारात नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात आले. परंतु, कंत्राटदाराच्या व प्रशासनाच्या  गलथान कारभारामुळे पाणीटंचाई असतानाही व मे महिना सुरू होऊनही नळ योजना सुरू झालेली नाही. गावातील विहिरी पूर्णतः आटल्या आहेत.

आठपैकी चार बोअरवेल बंदगावात आठ बोअरवेल असून त्यातील चार बंद आहेत, तर केवळ चार बोअरवेलला थोडे थोडे पाणी येते. महिलांना तासनतास रखरखत्या उन्हात बोअरवेलचा दांडा मारून-मारून घोटभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता गावातील जवळपास ६० टक्के लोकांनी घरी बोअरवेल मारल्या. परंतु, त्यातील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्या असून काहींना थोडे-थोडे पाणी येत आहे. अशी परीस्थिती असतानाही प्रशासनाचे याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष आहे.

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाहीचार्ली गावातील दिनकर आवारी यांनी पाणीटंचाई पाहता घरी २००-२५० फूट खोलीच्या दोन ठिकाणी बोअरवेल खोदल्या. परंतु, दोन्ही बोअरवेलला घोटभरही पाणी लागले नाही. त्यात त्यांचा ५० हजारांचा खर्च वाया गेला. यावरून वेकोली परिसरात पाण्याची पातळी किती खोल गेली आहे हे दिसून येते.

पाण्याच्या स्रोताअभावी नळ योजना कुचकामी ठरली. वेकोलीच्या सहकार्याने सुरू असलेली पाइपलाइन महामार्गाच्या कामात तुटली. ती दुरुस्त करण्याच्या सूचना वेळोवळी वेकोलिला दिल्या. सध्या कढोली शिवारात तयार करण्यात आलेल्या स्रोतावरून नळयोजना सुरू करण्याचे काम सुरू आहे. लवकरच नळ योजना सुरू होईल.-विजय निवलकर, सरपंच, चार्ली.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकWaterपाणी