चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:38 IST2018-06-04T12:37:53+5:302018-06-04T12:38:22+5:30

क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव येथे घडली.

The woman was brutally assaulted in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण

चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण

ठळक मुद्देआरोपींच्या दहशतीमुळे ग्रामस्थ होते गप्पघटना सात दिवसानंतर उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव येथे घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र श्रमिक एल्गार संघटनेने ही घटना उघडकीस आणून पोलिसांना रविवारी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करायला भाग पाडले.
पीडित महिलेचा नवरा वेडसर असून, आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी त्याने पोलीस पाटलांकडे त्यांनी धाव घेतली असता, त्यालाही जबर मारहाण करण्यात आली होती. पीडित महिलेवर चंद्रपुरात खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
येरगाव येथील प्रभाकर नागापुरे यांची पत्नी कुसूम हिच्यासोबत पीडित महिलेचे घरगुती कारणावरून २७ मे रोजी भांडण झाले. या भांडणावरून चिडलेल्या प्रभाकरने आपला पुतण्या नवनाथ याला बोलावून पीडितेच्या घरात दरवाजा तोडला व आत शिरले. तेथूनच तिला विवस्त्र करीत रस्त्यावर आणले आणि हातात असलेल्या बैलबंडीच्या उभारीने तिला बेदम मारहाण केली. नागरिक त्या ठिकाणी जमले. मात्र आरोपीने सर्वांना मध्ये आला तर जिवानीशी मारण्याची धमकी दिली. भर उन्हात बेदम मारहाणीने ही महिला बेशुध्द पडली असता, परत आरोपींनी तिच्या अंगावर पाणी टाकून मारणे सुरू केले. या घटनेची माहिती पीडितेच्या पतीने गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी याबाबत मूल पोलिसांना कळवून, नंतर पोलिसांच्या गाडीने पीडितेला मूल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पीडितेला घरी परत पाठविले.
गावात आरोपींची एवढी दहशत होती की कुणीही या घटनेवर बोलायला तयार नव्हते. या गंभीर घटनेची माहिती श्रमिक एल्गारच्या अध्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना समजताच, त्यांनी गावात जावून सत्य परिस्थितीची माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून या घटनेची माहिती पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांना देत, मूल पोलीस स्टेशनमध्ये जावून आरोपीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रभाकर बंडू नागापूरे, नवनाथ सुधाकर नागापूरे, कुसूम प्रभाकर नागापूरे यांच्या विरोधात अपराध क्रमांक ६१६/१८ कलम ३५४ (इ), ४५२, ३२४, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे.

Web Title: The woman was brutally assaulted in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा