ताडोबा प्रकल्पालगत भीषण अपघात, एक महिला पर्यटक ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:24 IST2020-12-01T13:13:43+5:302020-12-01T13:24:55+5:30
Chandrapur News Accident ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम फाट्याजवळ मंगळवारी सकाळी पर्यटकाकच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे.

ताडोबा प्रकल्पालगत भीषण अपघात, एक महिला पर्यटक ठार, चार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम फाट्याजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजता पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात चार पर्यटक जखमी झाले आहेत. सना गोयल (13) असे मृतकाचे नाव आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलविले. दोघांवर चिमूर येथेच उपचार सुरू आहे. फोर्ड कार क्रमांक एम एच 49 2489 ला अपघात झाला आहे. वाहनात नागपूरहुन गोयल परिवारातील 7 पर्यटक ताडोबात सफारीसाठी येताना ही घटना घडली.