धावत्या बसमधून महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:20+5:30

आपल्या सासूसह भद्रावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्यामुळे तिला तिकीट काढणे शक्य झाले नाही. तोपर्यंत बस वरोराजवळ पोहोचली. तिकिटासाठी तिने पैसे काढण्याकरता बॅग तपासली असता तिला आपल्या बॅगमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये एवढा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले.

A woman loses three lakh jewelery from a running bus | धावत्या बसमधून महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास

धावत्या बसमधून महिलेचे तीन लाखांचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा शहरात सातत्याने सोने चोरीच्या घटना वाढत असताना मंगळवारी एका महिलेच्या बॅगमधून प्रवासादरम्यान तीन लाखांचे दागिने लंपास केला.
वर्षा निखाडे ही महिला आपल्या सासूसह भद्रावती येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्यामुळे तिला तिकीट काढणे शक्य झाले नाही. तोपर्यंत बस वरोराजवळ पोहोचली. तिकिटासाठी तिने पैसे काढण्याकरता बॅग तपासली असता तिला आपल्या बॅगमधील आठ तोळे सोने आणि तीन हजार रुपये एवढा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. तिने याची माहिती बस वाहकाला दिली आणि बस वरोरा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. मात्र कुणाकडेही तो ऐवज आढळून आला नाही.
नुकत्याच दोन-तीन घटनांमध्ये चोरटयांनी महिलांच्या अंगावरील सोने नेल्याच्या घटना ताज्या असतानाच आता चोरटे चक्क धावत्या बसमधून ऐवज लंपास करायला लागल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भद्रावती येथे पाच वर्षीय मुलावर अत्याचार, आरोपी अटकेत
भद्रावती : शहरातील झिंगूजी वार्ड येथे राहणाऱ्यापाच वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. यातील वसीम गफ्फार शेख (२८) रा. भंगाराम वार्ड असे आरोपीचे नाव आहे. वसीम शेख हा टाईल्सचे काम करण्याकरिता या परिसरात गेला असता तिथेच खेळणाºया आठ वर्षीय व पाच वर्षीय दोन मुलांना आरोपींने पतंग घेवून देण्याचे आमिष देवून त्यांना न.प. कार्यालयाच्या मागच्या परिसरात नेले. यातील पाच वर्षीय बालकावर अत्याचार केला. ही घटना दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती संबंधित दोन्ही मुलांनी आपल्या आई- वडीलांना सांगताच त्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
 

घोसरी येथील सरपंचासह दोन महिलांचा विनयभंग
भद्रावती : तालुक्यातील घोसरी येथील महिला सरपंच व तिची मैत्रीण या दोघांना अश्लील शब्दात बोलून त्यांचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी घोसरी येथे घडली. या प्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चंदू दडमल रा. घोसरी असे आरोपीचे नाव आहे. चंदू दडमल याने याच गावातील महिला सरपंच व तिच्या मैत्रिणीला अश्लिल शब्दात बोलून त्यांचा विनयभंग केला. यामुळे संतप्त झालेल्या महिला सरपंचांनी या प्रकरणाची भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Web Title: A woman loses three lakh jewelery from a running bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.