शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने अनेकांची बत्तीगूल

By admin | Updated: March 29, 2016 02:29 IST

जिल्ह्यात अवकाळी पावसाची गडद छाया अद्यापही दूर झाली नसून या पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक

चंद्रपूर : जिल्ह्यात अवकाळी पावसाची गडद छाया अद्यापही दूर झाली नसून या पावसाचा कहर सुरूच आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शहरातील बत्ती गूल झाल्याने काही ठिकाणच्या नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक भिजले होते. त्यानंतर परत दोन दिवसानी मुसळधार पाऊस झाला होता. यात अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली तर काही ठिकाणी रस्त्यावर झाले कोसळली होती. पंधरा ते वीस दिवसांच्या विश्रातीनंतर रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. या वादळी पावसाचा फटका जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित संगीत रजनी कार्यक्रमालाही बसला. रविवारी सायंकाळी जीवती, तळोधी, घुग्घुस, सावली, मूल, ब्रह्मपुरी, गेवरा, चंद्रपूर, नागभीड, चिमूर आदी शहरात विजांच्या कडकडासह वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी खांबावर झाडे कोसळली. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा बंद होता. या वादळाचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती आणि ती खरी ठरली. (स्थानिक प्रतिनिधी)‘संगीत रजनी’ अर्ध्यावर गुंडाळला ४जिल्हा पोलीस दलातर्फे चंद्रपुरात रविवारी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस ग्राऊंडवर आयोजित कार्यक्रमाला शेकडो प्रेक्षकांची उपस्थिती होती. मात्र रात्री ९ वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साडेनऊ वाजताच्या सुमारास संगीत रजनी कार्यक्रम अर्ध्यावर गुंडाळण्याची पाळी पोलीस दलावर आली. पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मोठी तारांबळ उडाली. जिवती तालुका रात्रभर अंधारात४वादळी पावसाने अनेक ठिकाणी वीज खांबावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे जिवती शहरासह अनेक गावातील वीज पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. घुग्घुस, गेवरा, नागभीड येथेही वीज पुरवठा बंद होता.