दुर्लक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:54+5:302021-02-05T07:42:54+5:30
चंद्रपूर : दुर्लक्षित समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशा समाज बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ ...

दुर्लक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार
चंद्रपूर : दुर्लक्षित समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशा समाज बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच समाजातील होतकरू युवकांना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, या दिशेने माझे काम सुरू आहे. यामध्ये समाजाचेही सहकार्य लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जलनगर वार्ड येथे व्दितीय विदर्भस्तरीय मादगी समाज परिषद नुकतीच पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर देवतळे, प्रकाश चेनुरवार, रामाजी शंकावार, बाबुराव चंद्रगिरीवार आदी उपस्थित होते. आ. जोरगेवार म्हणाले, मादगी समाज विविध कारणांमुळे विकासापासून दुरावत चालला आहे. आता कारणे पुढे न करता त्यावर तोढगा काढण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजे. समाजातील मुले प्रतिभाशाली आहेत. मात्र, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. समाजाच्या समाज भवनासाठी दरवर्षी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या समाजातील नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.