शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींच्या आर्थिक अनियमिततावरून मनपात पुन्हा वाद पेटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

३१ जून २०२१ च्या ऑनलाइन सभेत विषय क्रमांक ६ मध्ये नोंदविल्याप्रमाणे लेखापरीक्षण अहवाल मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी ...

३१ जून २०२१ च्या ऑनलाइन सभेत विषय क्रमांक ६ मध्ये नोंदविल्याप्रमाणे लेखापरीक्षण अहवाल मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ करून सभेतून बाहेर निघाले होते. मनपासमोर निदर्शनेही केली; मात्र त्यानंतर सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर लेखापरीक्षणात दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. बुधवारी २३ जून २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये मागील सभेचा कार्यवृत्तही जोडण्यात आला. त्यामध्ये २०० कोटींप्रकरणी केवळ दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्याचा ठराव पारित केल्याची माहिती ‘लोकमत’ ने १८ जून २०२१ रोजी जनतेसमोर मांडली होती. या प्रकरणात तत्कालिन पदाधिकारी दोषी असल्याचा आरोप करून पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या; परंतु सत्ताधारी भाजपने साेईस्कर ठराव पारित केल्याने काँग्रेसचे मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सुनीता लोढिया, नंदू नागरकर व अन्य काँग्रेस नगरसेवकांचा तिळपापड झाल्याची चर्चा आहे. याचाच परिणाम म्हणून बुधवारच्या ऑनलाइन सभेत महापौर व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची तयारी केल्याचे समजते. याबाबत नगरसेवक नंदू नागरकर यांनी दुजोरा दिला. काँग्रेसचे नगरसेवक त्या ठरावाला कडाडून विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लेखा विभागाने ठेवला अनियमिततेचा ठपका

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चौकशीचे संकेत दिल्यानंतर राजेश मोहिते यांनी माध्यमांकडे स्पष्टीकरण पाठवून पदाधिकाऱ्यांच्या बचावाची भूमिका घेतली. लेखापरीक्षण अहवालानुसार, आक्षेपाधिन रक्कम १९८ कोटी आणि वसुलीपात्र रक्कम १.७९ कोटी आहे; मात्र पदाधिकाऱ्यांनी हात वर करून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव मागील सभेत पारित करण्यात आला. त्यामुळे या वसुलीपासून वाचण्याची धडपड सुरू असल्याची मनपाच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सत्ताधाऱ्यांची खेळी

बुधवारी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ८, ९ आणि १० अशा तीनच विषयांवर चर्चा करण्याची खेळी सत्ताधारी भाजपने केली आहे. यामध्ये ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्त वाचून पक्के करणे, मोहल्ला जटपुरा १ मधील शिट क्र. २३ नगर भूमापन क्रमांक २३३६ पैकी ५३ चौरस मीटर जागा हस्तांतरण करून सौंदर्यीकरण व देखभाल आणि जन्माच्या वेळी मुला-मुलींचे गुणोत्तर प्रमाण अहवाल सादर करण्याच्या विषयाचा समावेश आहे.