पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:01+5:302021-03-28T04:27:01+5:30
पळसगाव वनपरिक्षेत्र सर्वात जास्त जंगलाचा भाग आहे. त्यामुळे वानर, अस्वल, वाघ, माकडे, हरण यासह अन्य जंगली प्राण्यांचा वावर असतो. ...

पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव
पळसगाव वनपरिक्षेत्र सर्वात जास्त जंगलाचा भाग आहे. त्यामुळे वानर, अस्वल, वाघ, माकडे, हरण यासह अन्य जंगली प्राण्यांचा वावर असतो. या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाने पाणवटे तयार करण्याची गरज आहे. यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. मानवी वस्त्यावर, वाडी-तांड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीतही वन्यप्राण्यांसाठी नागरिक घराबाहेर पाणी ठेवत असल्याने वन्यप्राणीही पाण्याचा आसरा घेत आहेत. वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या शोधात असलेल्या वाघाने गावालगत एका जनावरावर हल्ला केला होता. त्यामुळे पाण्यासाठी पाणवठे उभारण्याची गरज आहे. या पाणी टंचाईच्या काळात या प्राण्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वन्यजीव मित्रांकडून करण्यात येत आहे.