शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नागभीड परिसरात वन्यप्राणी मानव संघर्ष विकोपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले.

ठळक मुद्देउपाययोजना आवश्यक : जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. तो वाघ जेरबंद झाला म्हणून तालुक्यातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष संपला असे मुळीच नाही. उलट हा संघर्ष निर्माणच होणार नाही यासाठी नागरिक आणि वनविभाग यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले. नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला ताडोबा आणि उमरेड कर्हांडला हे अभयारण्य अतिशय जवळ आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वीच शासनाने नागभीड तालुक्यातील घोडाझरीलाही अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबा आणि उमरेड कऱ्हाडल्याच्या मधोमध घोडाझरी अभयारण्य असल्याने वाघांच्या भ्रमंतीस मोठा वाव असून यातूनच नागभीड तालुक्यात सध्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तीन चार वर्षांपूर्वी उमरेड - कऱ्हाडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन हे दोन वाघ नेहमीच नागभीड तालुक्याच्या भ्रमंतीवर यायचे. विशेष म्हणजे श्रीनिवासनची तर नागभीड तालुक्यातील विलम गावाजवळ हत्या करण्यात आली होती. या तालुक्यातील मौशी ढोरपा, पाहार्णी, बोंड, बाळापूर, कोसंबी गवळी, डोंगरगाव, तळोधी, गोविंदपूर, गीरगाव, कचेपार या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ आणि बिबट यांचे दर्शन रोजच अनेकांना होत आहे. या वन्यपशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना नेहमीच घडत आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या. पण या महिन्यात तुकूम, सोनुली व मांगरूड येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या तीन व त्याअगोदर कोसंबी, गवळी आणि मिंडाळा येथील घटनांनी तालुक्यातील ग्रामीण जीवन हादरुन गेले. या पाचही हल्ल्यात शेतकरीच ठार झाले आहेत. आणि तेही वाघांनी शेतात येऊन शेतकºयांना शिकार केली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.उपाययोजना करणे गरजेचेतालुक्यात पाचही घटनांमध्ये वाघाने शेतात शेतकऱ्याला ठार केले. शेत जंगलानजिक आहे. नागभीड तालुक्यातच हजारो शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक आहे. या जंगली प्राण्यांनी कितीही हल्ले केले तरी शेतकऱ्यांना शेती ही करावीच लागणार आहे. असे हल्ले होऊ नयेत, मानव वन्यप्राणी संघर्ष वारंवार उद्भवू नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल