शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

तळोधी परिसरात सर्रास रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 5:00 AM

तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ   अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मातीची गरज लागली तर त्याच्या वाहनावर महसूल विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बाः अप्पर तळोधी बा. तहसील कार्यालयांअंतर्गत येत  असलेल्या बोकोडोह, वाढोणा व चिखलगाव नाल्यांतून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रॅक्टरने रात्रभर अवैध रेतीची तस्करी होत असताना महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करत नाही. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.अप्पर तळोधी तहसील कार्यालय रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जबाबदार अधिकारी नसल्याने दिवसा व रात्रभर अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असतानासुद्धा कारवाई केली जात नाही. या तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ   अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी सामान्य कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मातीची गरज लागली तर त्याच्या वाहनावर महसूल विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, वर्षभर रेती व मुरूमाची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांवर अजूनपर्यंत कारवाई केली जात नसल्याने रेती तस्कर सैराट झाले आहे. हा प्रकार बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागभीड शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज वाढई यांनी दिला आहे.

 

टॅग्स :sandवाळू