दहा हजाराची लाच घेताना वरोऱ्यात एपीआय जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:24+5:30

चंद्रपूर येथील एक व्यक्ती प्रशासनाकडून परवानगी घेवून कारने २१ मे रोजी बहिणीसह मध्य प्रदेशातील शिवणी गावाकडे निघाला होता. ही कार खांबाडा चेक पोस्ट नाक्यावरून पास झाली. त्याआधी टेमुर्डा ते खांबाडा या नागपूर मार्गावरील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वरोरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे याने कार मालकाला दूरध्वनी करून सदर अपघात तुमच्या वाहनाने झाला.

While taking bribe of ten thousand, API was caught in Warora | दहा हजाराची लाच घेताना वरोऱ्यात एपीआय जाळ्यात

दहा हजाराची लाच घेताना वरोऱ्यात एपीआय जाळ्यात

ठळक मुद्देगुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहा हजारांची लाच स्वीकारणाºया वरोरा येथील सहायक पोलीस निरीक्षकाला चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बोर्डा चौकात रंगेहात अटक केली. रमेश खाडे असे लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
चंद्रपूर येथील एक व्यक्ती प्रशासनाकडून परवानगी घेवून कारने २१ मे रोजी बहिणीसह मध्य प्रदेशातील शिवणी गावाकडे निघाला होता. ही कार खांबाडा चेक पोस्ट नाक्यावरून पास झाली. त्याआधी टेमुर्डा ते खांबाडा या नागपूर मार्गावरील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वरोरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे याने कार मालकाला दूरध्वनी करून सदर अपघात तुमच्या वाहनाने झाला. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. त्यातून सुटका हवी असेल तर पहिले दहा हजार रूपये देण्याची मागणी केली. मात्र, लाच द्यायची इच्छा नसल्याने कार मालकाने या प्रकरणाची तक्रार चंद्रपूर लाचलुचप प्रतिबंधक पथकाकडे केली.
लाचेची रक्कम येथील बोर्डा चौकात आणून देण्याचे मान्य केले. मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षकखाडे हे दहा हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक दुधलवार, उपअधीक्षक अविनाश भांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, अजय बागेसर, प्रांजल झिलपे, रविंद्र ठेंगळे, वैभव गाडगे, रोशन चांदेकर, दाबाडे आदींनी केली.

Web Title: While taking bribe of ten thousand, API was caught in Warora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.