बॅंकांमधील गर्दीचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:09+5:302021-05-05T04:46:09+5:30
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी, त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. मात्र नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यचे चित्र सध्या ...

बॅंकांमधील गर्दीचे करायचे काय?
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी, त्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. मात्र नागरिक आजही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. विशेषत: बॅंकामध्ये गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसून या माध्यमातून कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बॅंकेत पैसे काढण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रथम संचारबंदी केली. मात्र कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे लाॅकडाऊनची घोषणा केली. दरम्यान, याचवेळी विविध योजना जाहीर करून गरिबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. लाॅकडाऊन असले तरी बॅंकाना यातून वगळण्यात आल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या योजनांचे पैसे जमा झाले किंवा नाही तसेच जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिक बॅंकात चकरा मारत आहे. विशेषत: ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरातील बॅंकांमध्ये सध्या गर्दी बघायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतानाच बॅंकात मात्र गर्दी होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
बॅकेत आलेले ग्राहक म्हणतात
लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचे पैसे खात्यात जमा झाले की, नाही याबाबत बहुतांश ग्राहक बॅंकेत येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत आहे. शासनाने लाभार्थ्यांना घरपोच पैसे आणून देण्याची व्यवस्था करायला हवी. त्यामुळे बॅंकेतील गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल.
प्रतिभा कोडापे
चंद्रपूर
कोट
सध्या सर्वच बंद आहे. त्यामुळे उसनवारीने पैसे मिळत नाही. अशावेळी बॅंकेत असलेले पैसे काढावे लागते. अनेकांकडे एटीएम कार्ड असले तरी गरिबांकडे अद्यापही एटीएम नाही. त्यामुळे बॅंकेत जाऊनच जमा झालेले पैसे काढावे लागते.
सुरेश मडावी, चंद्रपूर
कोट
सध्या कोरोनामुळे बहुतांश नागरिक आजार पडले आहे. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी पैशाची गरज पडत आहे. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आहे. त्यामुळे अतिरिक्त पैसे काढण्यासाठी बॅंकेत गेल्याशिवाय पर्याय नाही.
- मोनिका वाकोडे, चंद्रपूर
--
अधिकारी म्हणतात....
लाॅकडाऊन आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध आहे. मात्र नागरिक बॅंकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर व्यवहारासाठी बॅंकेत येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून सांगितले जाते. अनेक वेळा त्वरित काम करून देण्याचा प्रयत्न असतो. मात्र सर्व्हर डाऊन तसेच इतर अडचणीमुळे कामात व्यत्यय येत आहे. त्यातच उन्हाचे दिवस असल्यामुळे प्रत्येक ग्राहक बॅंकेतच राहण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकांना मास्क लावण्यासंदर्भात सांगितले जाते. ग्राहकांनी बॅंकेत गर्दी न करता काही व्यवहार एटीएम, मोबाईलच्या माध्यमातून घरच्या घरी राहून केल्यास या गर्दीवर नियंत्रण येईल.