तीर्थक्षेत्र वढा येथे सुसज्ज सभागृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:46 IST2018-09-28T22:45:46+5:302018-09-28T22:46:10+5:30

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सभागृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची समस्या आता कायमची दूर होणार आहे.

A well-equipped hall will be set up at the pilgrim center | तीर्थक्षेत्र वढा येथे सुसज्ज सभागृह उभारणार

तीर्थक्षेत्र वढा येथे सुसज्ज सभागृह उभारणार

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची आश्वासनपूर्ती : ५० लाखांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वढा : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सभागृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची समस्या आता कायमची दूर होणार आहे.
चंद्रपूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. मागील वर्षी यात्रेदरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, बांधकामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २७ सप्टेंबर २०१८ला शासन निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तीर्थक्षेत्र वढा येथे विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.
वढा येथे दरवर्षी आषाढी एकादशीला भव्य स्वरुपात यात्रा भरते विदर्भातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दृष्टीने हे सभागृह महत्त्वाचे होते.

Web Title: A well-equipped hall will be set up at the pilgrim center