जिल्ह्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:58+5:302021-01-02T04:24:58+5:30
चंद्रपूर : २०२० हे वर्ष कोरोना संकटामुळे प्रत्येकासाठीच अत्यंत कठीण संकटाचा सामना करण्यात गेले. त्यामुळे नवीन वर्ष सुख, ...

जिल्ह्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
चंद्रपूर : २०२० हे वर्ष कोरोना संकटामुळे प्रत्येकासाठीच अत्यंत कठीण संकटाचा सामना करण्यात गेले. त्यामुळे नवीन वर्ष सुख, समृद्धीने जावे ही कामना करीत नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. दरम्यान, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले.
काही ठिकाणी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत फटाके तसेच डीजेच्या आवाजाची धूम सुरू होती. कोरोना संकटामुळे मागील वर्ष आठवणीचे ठरले. दरम्यान, सरत्या वर्षाचा निराेप तसेच नवीन वर्षाचे स्वागत केले. कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराघरात तसेच काही हाॅटेलमध्ये नववर्षाचे स्वागत केले. दरम्यान, काहींनी रात्री १२ वाजता फटाके वाजवित जल्लोष केला. मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा जल्लोष कमीच असल्याचे बघायला मिळाले.