रोजगार हमी योजना समितीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:31 IST2021-09-05T04:31:52+5:302021-09-05T04:31:52+5:30

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील २५ आमदारांचा समावेश असलेली महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर चंद्रपूर ऊर्जानगर ...

Welcome to the Employment Guarantee Scheme Committee | रोजगार हमी योजना समितीचे स्वागत

रोजगार हमी योजना समितीचे स्वागत

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील २५ आमदारांचा समावेश असलेली महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर चंद्रपूर ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृह येथे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियातर्फे त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली. ही समिती जिल्हास्थळी तीन दिवस राहून रोजगार हमी योजनांच्या कामांची फलश्रुती तपासणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आहेत. यांच्यासह समितीमध्ये विधान परिषद व विधानसभेच्या २५ आमदारांचा समावेश आहे. ही समिती हिराई विश्रामगृहावर पोहोचताच समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष राजकुमार जवादे, सल्लागार सुभाष मेश्राम यांनी स्वागत करून सत्कार केला. या वेळी समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आदी उपस्थित होते.

Web Title: Welcome to the Employment Guarantee Scheme Committee