वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:53+5:302021-02-05T07:43:53+5:30

चंद्रपूर : वेकोलीअंतर्गत लालपेठ ओपनकास्ट येथे काम करत असलेल्या मान कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी यंग चांदा ...

Wekoli should provide employment to the locals | वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्यावा

वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्यावा

चंद्रपूर : वेकोलीअंतर्गत लालपेठ ओपनकास्ट येथे काम करत असलेल्या मान कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

चंद्रपूर हा औद्यागिक जिल्हा असून बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथील उद्योगांमधील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांची भेट घेत वेकोलीअंतर्गत येणाऱ्या मान कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य महाप्रबंधक यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, विलास वनकर, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार, संतोष कुर्रा, सुरेश गोलेवार, वेनू कोडेल, अशोक गद्दामवार, इसरैल चेंनूरवार आदी उपस्थित होते.

Web Title: Wekoli should provide employment to the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.