शेतातील तणसाचे ढिगारे, मोटारपंप जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:58+5:302021-04-03T04:24:58+5:30
फोटो पळसगांव (पि) : नेरीवरून जवळ असलेल्या सावरगाव येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुणी अज्ञात इसमाने शेतात वणवा लावला ...

शेतातील तणसाचे ढिगारे, मोटारपंप जळून खाक
फोटो
पळसगांव (पि) : नेरीवरून जवळ असलेल्या सावरगाव येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुणी अज्ञात इसमाने शेतात वणवा लावला असता वाऱ्याने आग पूर्ण शेत परिसरात अंदाजे ५० ते ६० एकर जागेत पसरली आणि यात तणसाचे नऊ ढीग, शेतात पेरलेले उभे असलेले गहू, विहिरीवरील मोटारपंपाचे पाईप जळून खाक झाले.
आग इतकी भयंकर होती की शेतकरी विझवण्यासाठी धावले. परंतु आग आटोक्यात आली नाही. शेवटी भ्रमणध्वनीवरून राजेंद्र शेंदरे यांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आली. यात खूप मोठे नुकसान झाले.
हेटीजवळील शेती परिसरातील कुणीतरी अज्ञात इसमाने शेतात गवत काडीकचरा पेटविण्यासाठी आग लावली. आगीने रौद्ररूप धारण करीत सावरगाव शेत परिसरापर्यंत संपूर्ण शेतीचा बराच परिसर कवेत घेतला. त्यामुळे शेतात आगीचा धूर दिसताच गावातील शेतकरी आग विझवण्यासाठी शेतात धावले. यात राजेंद्र शेंदरे यांची तणीस, विहिरीवरील मोटारपंपचे पाच पाईप आणि सेक्शन पाईप जळून खाक झाले तर प्रवीण शेदरे यांचे २५ पाईप व शेतात उभे असलेले गहू जळून खाक झाले.
बॉक्स
रस्त्यामुळे लागूनच बाजूच्या शेतकऱ्याने आग पाहताच गहू कापणी सुरू केली. त्यामुळे थोडक्यात मोठे नुकसान टळले. नेरी सावरगाव रस्ता नसता तर रस्त्याच्या बाजूच्या शेतशिवार जळून खाक झाला असता व मोठी हानी झाली असती. घटनेची माहिती प्रशासनाला होताच महसूल मंडळाचे तलाठी मेहरकूरे यांनी घटनास्थळी रवाना होत नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा केला.