शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

"तुझी बातमी प्रकाशित करू.. " पत्रकार असल्याचा धाक दाखवून विधवा महिलेकडून एक लाखाची खंडणी

By परिमल डोहणे | Updated: November 6, 2025 19:57 IST

चार पत्रकारांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर :पत्रकार असल्याचा धाक दाखवत एका असहाय विधवा महिलेकडून एक लाख रुपये खंडणी वसूल करणाऱ्या पत्रकारांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी गुरुवारी गजाआड केलं आहे. 

राजु नामदेवराव शंभरकर ( ५७) चंद्रपूर, कुणाल यशवंत गर्गेलवार (३७) चंद्रपूर, अविनाश मनोहर मडावी (३३) उमरेड, राजेश नारायण निकम (५६) आग्रा असे अटकेतील पत्रकारांचे नाव आहे. 

५ नोव्हेंबर रोजी या टोळीने एका विधवा असाह्य महिलेला "तू अवैध काम करतेस, तुझी बातमी प्रकाशित करू" अशी धमकी देत बातमी थांबविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकीही देत जबरदस्तीने खंडणी घेतल्याची तक्रार  रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कलम ३०८(५), ३३३, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली. 

तपासादरम्यान हे सर्व जण विविध न्यूज पोर्टल, दैनिके आणि टीव्ही चॅनेलशी संबंधित असल्याचा दावा करून जिल्ह्यात फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांची ओळख पटवून एकामागोमाग चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस तपासात या टोळीचे आणखी दोन साथीदार असल्याचेही निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, निलेश वाघमारे, हनुमान उगले, पोअं. जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्लवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे आदींनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Journalists extort widow: Threaten to publish news, demand ransom.

Web Summary : Chandrapur: Four journalists arrested for extorting a widow by threatening to publish false news and demanding ₹1 lakh. Police investigation revealed their involvement with various news portals. Further investigation is underway.
टॅग्स :MONEYपैसाJournalistपत्रकारPoliticsराजकारण