आम्ही दंड भरणार पण, मास्क नाही लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30

चंद्रपूर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केला आहे. दरम्यान, चंदपूर जिल्हयातही मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे सुरु केले आहे. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेले नियम तोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

We will pay the fine but not the mask | आम्ही दंड भरणार पण, मास्क नाही लावणार

आम्ही दंड भरणार पण, मास्क नाही लावणार

ठळक मुद्दे५ हजार ७९४ नागिरकांवर कारवाई : १३ लाखांवर केला दंड वसुल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू आपले पायेमुळे घट्ट रोवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रादूर्भाव रोखण्यासाठी सक्त पाऊल उलचले सुरु केले असून विविध पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी होण्याऱ्या गर्दीवर तसेच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु केला आहे. या अंतर्गत मागील सात दिवसांमध्ये ५ हजार ७९४ नागरिकांकडून तब्बल १३ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केला आहे. दरम्यान, चंदपूर जिल्हयातही मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे सुरु केले आहे. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेले नियम तोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांना वठणीवर आणण्यासाठी दंड वसुल सुरु केला आहे. मागील सात दिवसामध्ये जिमखाना, क्लब, मंगल कार्यालय, रेस्टाॅरंट, सिनेमा गृह, माल्स,बाग, तसेच सार्वजनिक ठिकाण अशा तब्बल २ हजार ३५४ ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यामध्ये ८४ ठिकाणी नियम पाळला जात नसल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करीत १ लाख ७४ हजार १०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर बाजार तसेच इतर ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्या ५ हजार ७९४ नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १३ लाख ३९ हजार ७०० रुपये वसुल केले आहे.


कोरोना संकट अद्याप गेले नाही. प्रादूर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण फिरू नये, मास्क लावावे, नियम पाळावे, अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावे. लक्षणे आढळून आल्यास जवळच्या रुग्णालयात जावून कोरोनाची तपासणी करून घ्यावी.
- मनोहर गव्हाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर

Web Title: We will pay the fine but not the mask