आपण दाेघे भाऊ मस्तीत राहू ... ! ताडोबात बबलीच्या दोन बछड्यांची मौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 20:06 IST2023-07-13T20:05:35+5:302023-07-13T20:06:47+5:30
Chandrapur News ताडोबातील बबली वाघिणीच्या दोन बछड्यांची अशी दंगामस्ती पर्यटकांना नेहमीच पहावयास मिळते.

आपण दाेघे भाऊ मस्तीत राहू ... ! ताडोबात बबलीच्या दोन बछड्यांची मौज
राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातवाघांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे हमखास वाघांचे दर्शन होते. केवळ दर्शनच नाही तर वाघांच्या झुंजी, त्यांचा मुक्त विहारही बघायला मिळतो. असाच एक रोमांचक प्रसंग ताडोबाच्या अलिझंजा बफर झोन परिसरात पर्यटकांना मंगळवारी सकाळी अनुभवायला मिळाला. बबली वाघिणीच्या दोन बछड्यांचा मौजमस्तीचे हे दुर्मीळ दर्शन मुंबईचे पर्यटक फोटोग्राफर विवान करापूरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. चालक प्रवीण बावणे यांनीही आपल्या कॅमेऱ्यात काही छायाचित्रे टिपली.
अलिझंजा बफर झोन परिसरात सध्या बबली वाघीण व तिचे तीन बछडे, भानुसखिंडी वाघीण व तिचे दोन बछडे, शिवाय छोटा मटका या वाघांचा अधिवास आहे. त्यापैकी बबली व तिचे तीन बछडे सध्या नऊ ते दहा महिन्यांचे झाले आहेत. या बछड्यांना बबलीने वेगवेगळे धडे दिले. जणू त्याचा अभ्यासच बबलीचे बछडे करीत होते. बबलीच्या दोन बछड्यात सुरू असलेली मस्ती समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.