नऊ तालुक्यांतून कोरोना ओसरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:45+5:302021-06-26T04:20:45+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ६१८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ५९१ ...

On the way to Corona Osran through nine talukas | नऊ तालुक्यांतून कोरोना ओसरण्याच्या मार्गावर

नऊ तालुक्यांतून कोरोना ओसरण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ६१८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ५९१ झाली आहे. सध्या ५०३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

बाधित आलेल्या १३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १, बल्लारपूर ४, मूल २, गोंडपिपरी १, राजुरा २, वरोरा १ व इतर ठिकाणच्या २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ५ लाख ४७ हजार ७०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ६० हजार ३८२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५२४ बाधितांचे मृत्यू झाले आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे, त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: On the way to Corona Osran through nine talukas