कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:20+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात मार्च २०२१ अखेरनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत होते. जिल्ह्यात प्रशासनाने ३४ विलगीकरण कक्षाची स्थापना केली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्व विलगीकरण कक्ष रुग्णांने फुल्ल झाले होते. त्यामुळे येथे परिचारिका, सुरक्षारक्षक, स्वच्छक आदींची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने त्यांना कामावरुन कमी केले आहे.

कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात सुरु केलेल्या विलगीकरणात कक्षात मोजकेच रुग्ण आहेत. त्यामुळे येथे नेमलेल्या कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी करण्यात येत आहे. परिणामी त्या कामागारावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मार्च २०२१ अखेरनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत होते. जिल्ह्यात प्रशासनाने ३४ विलगीकरण कक्षाची स्थापना केली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्व विलगीकरण कक्ष रुग्णांने फुल्ल झाले होते. त्यामुळे येथे परिचारिका, सुरक्षारक्षक, स्वच्छक आदींची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली. मात्र आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने त्यांना कामावरुन कमी केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग असतानाही राष्ट्रहिताचे काम म्हणून आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावली. परंतु, आता त्यांना कामावरुन कमी केल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
वेळ पडली की बोलावले, नंतर हाकलले !
कोरोनाच्या दहशतीमुळे घरचे कोविड सेंटरमध्ये काम करु नको, असे म्हणतानासुद्धा राष्ट्रहिताचे काम म्हणून सेवा दिली. मात्र आता बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. वेळ पडली तर कामावर बोलवायचे आणि नंतर काढून टाकायचे असे धोरण सुरु आहे. - परिचारिका
कोरोनामध्ये आपणसुद्धा सेवा द्यावी, या उद्देशाने कोविड सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहे. कर्तव्य बजावताना अनेक अडचणी आल्या. परंतु, प्रामाणिक कर्तव्य बजावले. रुग्ण कमी झाल्याने आमच्या काही सहकाऱ्यांना कमी केले आहे.
- सुरक्षारक्षक
अनेक कोविड केअर सेंटर बंद
ल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यात ३४ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. येथे काही प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॅान्सेट्रेटरची व्यवस्था केली होती. त्यामुळे रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे सोईच होत होते. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख घरसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोविड केअर बंद आहेत.