शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारने ‘जलसंजीवनी’

By admin | Updated: September 30, 2015 01:24 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले तर भूजल पातळीत घट येऊन शेतपिकांना पाणी देणे अवघड जाते. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे ही अडचण आता काही प्रमाणात दूर झाली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावात पाण्याचे स्त्रोत वाढले असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २१८ कामे करण्यात आली आहेत. या कामांवर ३६ कोटी ६२ लाख रूपये खर्च झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देऊन उपलब्ध जलस्त्रोताच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे अनेक गावांना याचा फायदा झाला आहे. जिल्हाभरात विविध विभागाच्या निधीतून ४ हजार २१८ कामे करण्यात आली असून यासाठी ८६ कोटी २७ लाख ३० हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला. यात प्रत्यक्षात ३६ कोटी ६२ लाख ५० हजार रूपये खर्च झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून झालेली कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात आली. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून झाली आणि कामांचे मूल्यमापनही करण्यात आले. असा आहे अभियानाचा उद्देशलोकसहभागातून जलस्त्रोतांचा साठा वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भुर्गभातील पाणी पातळी वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढवून शेतीला पाणी देणे, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, नविन कामे हाती घेणे, अस्तीत्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्नस्थापीत करणे आदी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.शेतकऱ्यांना झाला लाभयावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. पेरणी केल्यानंतर पावसाने दगा दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तलाव, बोड्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोयीचे ठरले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरविणे व पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. यावर्षी या अभियानाच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण झाली असून अत्यल्प पावसात या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तलाव, बोड्यांचे पाणी शेतकऱ्यांना कामी आले. पहिल्या वर्षी या अभियानासाठी २१८ गावांची निवड करण्यात आली असून पाच वर्षात या अभियानाची कामे करायची आहेत. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा लाभ शेतकरी व नागरिकांना होईल.- डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी, चंद्रपूर.