वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:09+5:302021-04-02T04:29:09+5:30

वढोली : वढोली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील सात दिवसापासून बंद आहे. परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या पाच गावांना ...

Water supply to five villages including Vadoli cut off | वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

वढोलीसह पाच गावांचा पाणीपुरवठा बंद

वढोली : वढोली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील सात दिवसापासून बंद आहे. परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या पाच गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे.

काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने नाल्यातील गढूूळ पाण्याने तहान भागविण्याची दुर्दैवी वेळ गावकऱ्यांवर ओढावली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. वढोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाच गावांची तहान भागविली जाते. ही योजना ठेकेदारमार्फत चालवली जात आहे. या योजनेंतर्गत वढोली, तारडा, फुरडी हेटी, खराळपेठ, बोरगाव, चेकबोरगाव या पाच गावांचा समावेश आहे. मात्र मागील सात दिवसांपासून योजना ठप्प आहे. योजनेत आलेला बिघाड दुरुस्त करण्याकडे ठेकेदाराचे व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी योजनेतील सहा गावांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्याने नाल्यातील गढूळ पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत. तालुक्यातील पाणीपुरवठा करणारी लाईन ही पोंभुर्णा तालुक्यात जोडली असून गोंडपिपरी सर्किटमध्ये जोडावी, अशी मागणी केली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच पाणी टंचाईची झळ बसल्याने गावकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Web Title: Water supply to five villages including Vadoli cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.