देवाडा बुज नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:34+5:302021-03-29T04:16:34+5:30

गावात शुध्द पाण्याचा दुष्काळ पोभुर्णा : तालुक्यातील अवघड क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील पाणी पुरवठा योजनेच्या ...

Water supply to Devada Buz pipeline stalled | देवाडा बुज नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प

देवाडा बुज नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प

गावात शुध्द पाण्याचा दुष्काळ

पोभुर्णा : तालुक्यातील अवघड क्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा विद्युत पुरवठा वीज न भरल्याच्या कारणास्तव वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे गावात नळयोजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

गावातील नळयोजनेचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटावरून पाणी आणण्याची पाळी आली आहे. येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत बील ४० हजार रुपये थकित असल्याचे कळते. गावात पाणी टंचाईचा सावट पसरले असतानादेखील येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. तेव्हा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा पुर्ववत सुरू करावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Web Title: Water supply to Devada Buz pipeline stalled