भर पावसाळ्यात पाणीटंचाई
By Admin | Updated: July 31, 2016 01:55 IST2016-07-31T01:55:56+5:302016-07-31T01:55:56+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने

भर पावसाळ्यात पाणीटंचाई
सिंदेवाही : नगरपंचायत प्रशासकांचे दुर्लक्ष
सिंदेवाही : शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने पिण्याचे नळाला पाणी येत नाही. परिणामी महिलांना भर पावसात पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवरचा प्रभाव कमी असल्याने कर्मचारी वाटेल तसे वागत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील पाणी, विद्युत, नाल्या सफाई, गाळ फेकणे, नगरपंचायतमधील कामे होत नसल्याची ओरड होत आहे. मोटारपंप बंद, नदीला पूर, विद्युतपुरवठा बंद, पाईपलाईन फुटली आदी कारणे बऱ्याच वर्षांपासून कायम आहेत. मागील दोन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती सत्ता आहे. समस्या खुप आहेत. पण २५ टक्के समस्या दूर होतील असे वाटत असताना समस्यामध्ये रोज भर पडत आहे.
नगरपंचायतला शासनाच्या वतीने दोन वर्षांत निधी आला नसल्याचे प्रशासकांचे मत आहे. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. मात्र, निधी तसाच कायम असल्याने नगरपंचायत आवक कमी आणि जावक जास्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युतबिल, स्टेशनरी खरेदी, किरकोळ खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासकांना पडला आहे. वारंवार निधीची मागणी केली असता निधी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या व विद्युत समस्या दिवसेंदिवस वाढणार हे नक्की! (शहर प्रतिनिधी)