शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:47 IST

Chandrapur : पाण्यासाठी सुरु आहे पायपीट; विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड पंचायत समिती अंतर्गत १५ गावात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या गावातील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींचे पाणी तळाशी गेल्याने १५ गावातील नागरिकांची पाण्यासाठी चांगलीच त्रेधा तिरपट उडत असल्याची माहिती आहे.

उन्हाळा आता ऐन भरात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक पाणी स्त्रोतावर महिलांची गर्दी वाढली आहे. परिणामी विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी नळयोजनेच्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने तर काही ठिकाणी जल जीवन मिशनद्वारा सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे.

पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार पांजरेपार येथील नळयोजना बंद पडल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पान्होळी येथील नळयोजनेच्या विहिरीत पाणी नसल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोर्धा, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, ढोरपा, चारगाव चक, मोहाळी, मिंथूर, कसर्ला येथील विंधन विहिरी आणि सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कन्हाळगाव व बोंड येथे नळयोजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या दोन गावात पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. कसर्ला येथील पाणीटंचाईस जल जीवन मिशनचे काम अपूर्ण हेही कारण सांगितल्या जात आहे.

सुचविण्यात आलेल्या उपाययोजनाया गावात पाणी टंचाईच्या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी गावातील विहिरींचे गाळ काढणे, जुन्या विंधन विहिरी फ्लशिंग करणे, गावात नवीन विंधन विहिरी खोदणे, इन्व्हेल बोअर मारणे आदी उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र या उपाययोजनांची पूर्तता केव्हा करण्यात येते या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात येथील प्रभारी गटविकास अधिकारी शुक्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, पण त्यांचेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर