१६१ पाण्याचे नमुने फ्लोराईड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत डिसेंबर २०१९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण ...

Water samples inhibit fluoride | १६१ पाण्याचे नमुने फ्लोराईड बाधित

१६१ पाण्याचे नमुने फ्लोराईड बाधित

Next
ठळक मुद्देपृथकरणाचा अहवाल : प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत डिसेंबर २०१९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या एकूण २४६१ पाणी नमुन्यांपैकी १६१ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चंद्रपूर आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी करीत असतात. यामध्ये पाण्यातील फ्लोराईडचे व दूषित पाण्याचे प्रमाण तपासणी केल्या जाते.
चंद्रपूर तालुक्यातील ३३१ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी २१ फ्लोराईड बाधित नमुने आढळले आहे. बल्लारपूरमध्ये ७२ तपासलेल्या नमुन्यांपैकी दोन फ्लोराईड बाधित नमुने, राजुरा तालुक्यातील ९२ तपासलेल्या नमुन्यांपैकी एक नमुना फ्लोराईड बाधित, कोरपनामधील २०१ नमुन्यांपैकी दहा, भद्रावती तालुक्यामध्ये १९१ तपासलेल्या नमुन्यांपैकी चार नमुने फ्लोराईड बाधित आहेत. ब्रह्मपुरीमध्ये ७५ तपासलेल्या नमुन्यांपैकी सर्वच पाणी नमुने पिण्यायोग्य आहेत, नागभीड तालुक्यामध्ये १३५ तपासलेल्या पाणी नमुन्या पैकी सर्वच पाणी नमुने पिण्यायोग्य आहेत, गोंडपिंपरीमध्ये ५० पाणी नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य तर पोंभुर्णा तालुक्यामधील २६२ तपासलेल्या नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य आढळून आले आहे.
वरोरा मध्ये ११३ पाणी नमुने तपासल्यानंतर १५ पाणी नमुने फ्लोराईड बाधित, चिमूर तालुक्यामध्ये ३५८ तपासलेल्या नमुन्यांपैकी ६३ नमुने फ्लोराईड बाधित, सावलीमध्ये १९९ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी २२ पाणी नमुने फ्लोराईड बाधित, मूल तालुक्यातील १४४ पाणी नमुने तपासल्यानंतर २४ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहे, तर सिंदेवाही तालुक्यामध्ये २३८ तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी सर्वच नमुने पाणी पिण्यायोग्य आढळून आले आहे.
जिल्ह्यातील एकूण २४६१ तपासलेल्या नमुन्यांपैकी १६२ फ्लोराईड बाधित तर जिल्ह्यातील दूषित नमुन्यांची टक्केवारी ६.५८ आहे.
जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून या फ्लोराईड बाधित स्त्रोतांबाबत कार्यवाही सुरू आहे.

Web Title: Water samples inhibit fluoride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी