सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:33+5:30

मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली होती. दरम्यान, वेकोलिने अनुदान मंजूर केल्याने आता प्रत्येक नागरिकांना घरी रेनवाटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभरण्यास ५ हजारचे अनुदान मिळणार आहे.

Water recharge system now on public hand pumps | सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा

सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा

ठळक मुद्देयंदा संकल्प वर्ष : इको-प्रोच्या प्रयत्नांची आयुक्तांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शहरातील सार्वजनिक हातपंपावर इको-प्रोतर्फे जलपुनर्भरण यंत्रणा उभारण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला. या प्रयोगाची उपयोगिता लक्षात घेऊन मनपाचे आयुक्त संजय काकडे यांनी बुधवारी हातपंपाला भेट देऊन पाहणी केली.
मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली होती. दरम्यान, वेकोलिने अनुदान मंजूर केल्याने आता प्रत्येक नागरिकांना घरी रेनवाटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभरण्यास ५ हजारचे अनुदान मिळणार आहे. यात पालिका व वेकोलिकडून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्यात येईल. या निधीमधून हातापंपामधून वाया जाणारे पाणी तिथेच जमिनीत पुनर्भरण केल्या जाणार आहे. या प्रयोगाकरिता मनपा आयुक्त आयुक्त काकडे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने मनपाने स्वखर्चाने विठ्ठल मंदिर वार्डातील २ हातपंप नमूना म्हणून निवड करण्यात आली आहे.
हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून योग्यरित्या बांधकाम केल्यास शहरातील सर्व हातपंपांवर यंत्रणा सुरू होईल. यावेळी मनपा अभियंता रव हजारे, इको-प्रोचे बंडु धोतरे, नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, अमोल उत्तलवार, सचिन धोतरे, सुनील मिलाल उपस्थित होते.

असे आहे स्वरूप
चंद्रपुरातील दोन सार्वजनिक हातपंपाजवळ ४ फुट लांब व ४ फुट रुंद व ४ फुट खोल गड्डा करून शोषखड्डा तयार करण्यात आला. यामधे तयार काँक्रीट पाइप टाकून गिट्टी, चुरी व फिल्टर माध्यम वापरण्यात आले. वाया जाणारे पाणी जमिनीत जिरविले जाईल. यासोबत पावसाळ्यात लगतच्या घरांवरील पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाईल. बोरवेलचे जलपुनर्भरण सोबतच लगतच्या घरांचे रेनवाटर हार्वेस्टिंग शक्य होईल. हे वर्षे संकल्प म्हणून मनपाने जाहीर केले.

Web Title: Water recharge system now on public hand pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी