ब्रह्मपुरीत अनेक घरांत पाणी शिरले
By Admin | Updated: July 28, 2014 23:26 IST2014-07-28T23:26:53+5:302014-07-28T23:26:53+5:30
ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात

ब्रह्मपुरीत अनेक घरांत पाणी शिरले
बारई तलाव फुटला : ब्रह्मपुरीत दोन तास मुसळधार पाऊस
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात अनेकांच्या घरात पाणी शिरले. शेषनगर जलमय झाल्याने रस्त्यावरुन येणे-जाणे कठीण झाले होते.
ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल दोन तास सारखा मुसळधार पाऊस कोसळत राहिला. यापूर्वीही पावसाने परिसरात चांगलाच प्रतिसाद दिला होता. पण सकाळी पडलेला पाऊस मुसळधार होता. या पावसाने शेषनगरला लागून असलेल्या बारई तलावाने कमाल मर्यादा गाढली. तलाव तुडूंब भरले. दरम्यान, शेषनगरजवळील तलावाची बांध फूटली व पाण्याचा पूर शेषनगरमधून वाहू लागला. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने याच ठिकाणावरुन बांध फूटला होता. प्रशासनाने त्यावेळी थातुरमातूर उपाययोजना केली होती. त्याचवेळी गांभीर्यान व अचुक बांध दुरुस्ती केली असती तर पुन्हा यावर्षी हा प्रकार उद्भवला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तलावाच्या सभोवताल घनदाट वस्ती उभी झाली आहे. परंतु तलावावरील बांध अनेक वर्षांपासून जसाच्या तसाच कायम आहे. त्यामुळे तलावाची बांध कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी शेषनगर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने गणवीर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांना जाणे-येणे करणे कठीण झाले होते. अचानक नागरिकांच्या घरात पाणी शिरणे सुरू झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. घरातील साहित्य पाण्याखाली आले. दोन तास पडलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे, शेषनगर, शांतीनगर, आनंदनगर, डॉ. आखरे हॉस्पिटल मागील परिसर, नवीन ले-आऊट भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. आजच्या पावसाने पुन्हा या रस्त्यांची दैना झाली. नगरपालिकेने नवीन भागाचा विकास करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)