शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

पाण्याची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST

राजुरा : तालुक्यातील गोवरी परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदी, ...

राजुरा : तालुक्यातील गोवरी परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदी, नाले कोरडे पडायला लागल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ढिगाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव

गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहेत. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे वेकोलीचे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहेत.

जुन्या वाहनांना कालबाह्य करावे

घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता

गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोलपंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबुराव शेडमाके चौक येथे गतिरोधक नसल्याने वाहने वेगाने जात आहेत. यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या वाढली आहे.

दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी

कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी, या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाहीत. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

संपादित जमिनीचा मोबदला द्यावा

सिंदेवाही : नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही शेतमालकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

कोंडवाड्यांतील जनावरे असुरक्षित

कोरपना : मोकाट जनावरांना ठेवण्यासाठी गावागावांत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, सद्यस्थितीत या कोंडवाड्यांची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी केली जात आहे.

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा

बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वेर्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल.

पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा येथे कठडे बसविण्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

गावांना रस्त्याची प्रतीक्षा

वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

रस्ता दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी

घोडपेठ : कुडरारा ते चिरादेवी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. रस्त्याअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मोठी पंचाईत होते.

किसान सन्मान योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी

चिमूर : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची आगामी काळात निवडणूक आहे. त्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व किसान सन्मान योजनेची रक्कम खात्यात जमा झाल्याने ती काढण्यासाठी बँकांत गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेतील आवक वाढली आहे.

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, काही ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.