शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील आदिवासी कोलाम पाड्यांवर पाणीबाणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 12:10 IST

पाण्यासाठी महिलांचा टाहो : विहिरी कोरड्या, हातपंप नादुरुस्त, जलजीवन मिशनच्या कामांचा पत्ता नाही

चंद्रपूर-जिवती : जिवती तालुक्यातील पहाडावरील आदिवासी कोलाम पाड्यांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी, यासाठी दरवर्षी वारेमाप घोषणा होतात. मात्र, प्रत्यक्षात कामे होत नसल्याने पाण्यासाठी टाहो फोडण्याशिवाय नागरिकांच्या हाती काही पर्याय नसतो. यंदाही विहिरी कोरड्या पडल्या. हातपंप बंद पडले. नागरिकांची आस असलेल्या जलजीवन मिशनची २४ कामे अद्याप सुरू न झाल्याने पाणीबाणीचे संकट कायम आहे.

नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने शासनाने जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. जिवती तालुक्यात या योजनेअंतर्गत १५९ कामे मंजूर आहेत. त्यापैकी २४ कामांचा श्रीगणेशा करण्यात आला नाही. पावसाळा तोंडावर असून अनेक गावात विहीर, टाकी व पाइपलाइनचे काम अपूर्णच आहे. मार्च अखेरीला ही कामे पूर्ण करून प्रत्येक कुटुंबातील प्रती व्यक्ती ५५ लिटर पाणी देऊ, असा दावा सरकारने केला होता. मात्र, जिवती तालुक्यात ही योजना यशस्वीपणे न राबविल्याने आदिवासी कोलाम पाड्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच पाणीटंचाईने होरपळून निघत असताना काही कामे कंत्राटदार कासवगतीने करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

जि. प. च्या तिजोरीत ठणठणाट

शासनाने गाजावाजा करत जलजीवन मिशन योजनेची काही कामे सुरू झाली. मात्र कामे पूर्ण करूनही वेळेवर देयके मिळत नाहीत. जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे अधिकारी सांगतात, त्यामुळेही कामाला विलंब होत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे.

बांधकामात वन कायद्यांची आडकाठी

जिवती तालुक्यातील बहुतांश जमीन ही वनजमीन घोषित असल्याने प्रत्येक विकासकामासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. हेच कारण पुढे करून आवश्यक ठिकाणीही विहीर खोदण्यात आलेली नाही. खोदकाम, टाकीचे बांधकाम, पाइपलाइनच्या कामावर अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत काम अडवले जात आहे. वनकर्मचारी कंत्राटदाराकडून पैसे उकळत असल्याची बाबही एका कंत्राटदाराने सांगितली.

घनपठार, नाईकनगर, हिमायतनगरातही हाहाकार

जलजीवन मिशनची कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या कंत्राटदारांना सूचना असूनही अनेक कंत्राटदार या नियमाकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. घनपठार, नाईकनगर, हिमायतनगर आदी गावांमध्ये महिला पाण्यासाठी टाहो फोडत असून नागरिकांकडून पूर्ततेची मागणी केली जात आहे. या ठिकाणी पाण्यासाठी कायमस्वरूपी कुठलीही उपाययोजना नाही. त्यामुळे हाहाकार उडाला आहे.

तहान लागल्यावर बांधकाम

काही कंत्राटदारांकडून जवळच्याच नाल्यातील निकृष्ट दर्जाच्या मातीमिश्रित काळ्या वाळूचा वापर विहीर बांधकामात केला जात आहे. याकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. जलजीवन मिशनची कामे लवकर पूर्ण झाली, तर पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. मात्र तहान लागल्यावरच प्रशासनाकडून बांधकाम केले जात असल्याने संकटांवर मात करता आले नाही.

जिल्ह्यात ६० गावे संकटग्रस्त

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६० गावे जलसंकटग्रस्त म्हणून प्रशासनाने जाहीर केली. यातील बहुतांश गावे जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील आहेत. यंदा पाणीटंचाई असली तरी टँकरद्वारे पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक स्वत:च धावाधाव करून पाण्याचा शोध घेत आहेत.

२० एलपीसीडीपेक्षा कमी पाणीपुरवठा

२० एलपीसीडीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आल्यास संबंधित गावांत जलटंचाईवर मात करणाऱ्या योजना राबविल्या जातात. त्यात विंधन विहीर खोदणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, नळयोजना व कूपनलिका दुरुस्तीची कामे केली जातात. २०१९ मध्ये २० एलपीसीडीपेक्षा कमी पाणीपुरवठा असलेली ४१९ गावे होती. २०२२ मध्ये ती ३७ गावांवर आली. ही जमेची बाजू आहे. मात्र कोट्यवधींचा निधी खर्चूनही चंद्रपूर जिल्हा अजूनही टंचाईमुक्त झाला नाही.

चंद्रपुरातही नागरिक पाहतात टँकरची वाट

चंद्रपुरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पूर्णतः नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. योजनेची बरीच कामे पूर्ण झाली. चंद्रपूर शहर अजूनही टँकरमुक्त झाले नाही. एक दिवस आड पाणीपुरवठा होत असल्याने आजही काही भागांत चार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महानगर पालिकेवर आली आहे. अमृत नळ योजनेचे काम काही भागात सुरूच आहे. मीटर लागले पण पाणीपुरवठा नाही, अशी स्थिती आहे. पाणी गळतीवरही प्रशासनाला मात करता आली नाही.

महापालिकेची अमृतच्या दुसऱ्या टप्प्यावर मदार

  • वाढत्या लोकसंख्येनुसार पहिल्या टप्प्यातील अमृत नळ योजना मुबलक पाणीपुरवठ्यास पुरेसे नाही. हे स्पष्ट झाल्याने मनपाने अमृत अभियान २ राबविण्याचा प्रकल्प अहवाल तयार केला.
  • अमृत अभियान २ प्रकल्पाला ३०७ कोटी ६५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
  • इरई धरणातून सध्या उचलण्यात येणारे ४५ एमएलडी पाणी दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
  • अमृत अभियान २ प्रकल्पाला जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली.
  • अमृतसाठी केंद्र शासन ३३.३३ टक्के, राज्य शासन ३६.६७ टक्के व मनपाचा हिस्सा ३० टक्के राहणार आहे.
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीwater shortageपाणीकपातchandrapur-acचंद्रपूर