शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

३५ वर्षांनंतर मिळाले पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:14 IST

सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : मौलझरी तलावाची सिंचन क्षमता चारशे हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सत्ता परिवर्तनानंतर आजारी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत करून सिंचन वाढविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला चंद्रपूरमध्ये पाठबळ मिळाले आहे. राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात चारशे हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे. अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला शासन-प्रशासनाची मिळालेली साथ यामधून हा चमत्कार चंद्रपूर जिल्ह्यात साकारला गेला आहे.साधारण चाळीसी ते पन्नाशीमध्ये गेलेल्या पिढीला चंद्रपूर-मूल राज्यमार्गावर असणारा मौलझरी लघू पाटबंधारे तलाव आठवत असेल. १९७२-७३ मध्ये या तलावाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सन १९८३ मध्ये या तलावाच्या धरण पाळीचे काम पूर्ण करण्यात आले. या तलावातून चारशे हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल, अशी आशा या भागातील नागाळा, महादवाडी, गोंडसावरी या गावांना होती. मात्र दरवर्षी येणारा पाऊस तलाव भरून काढायचा. पण काही दिवसातच धरण पाळीतून ३५ वर्ष सतत पाणी वाहून जात होते.त्यामुळे या तीनही गावातील नागरिक सातत्याने काहीतरी उपाययोजना होऊन पाणी साठेल, यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागे लागत होते. मौलझरी लघू पाटबंधारे तलाव व त्यासाठी करण्यात येणाºया प्रत्येक उपाययोजनेबाबत या काळात आणखी एक व्यक्ती सातत्याने विधानसभेमध्ये लढत होता. ते होते तत्कालीन आमदार सुधीर मुनगंटीवार !२०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र ना. मुनगंटीवार यांनी आपल्या जुन्या मागणीसाठी पुन्हा एकदा या तलावाबाबत काय करता येईल, यासाठी अधिकाºयांना विचारमंथन करायला सांगितले. पाटबंधारे विभागाचे चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी तलावाच्या धरण पाळी खालून होणारी गळती थांबविण्याकरिता सिमेंट ग्राउंटींग करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला.हा प्रस्ताव पुढे ठेवताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एका ठिकाणी केलेला यशस्वी प्रयोग पालकमंत्र्यांना सांगितला. कार्यकारी अभियंता सोनोने यांचा प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. २७ मार्चला भूमिपूजन झाले आणि त्यानंतर चार महिन्यांपर्यंत पाळीच्या मध्यभागातून तीन समांतर रंगांमध्ये जलरोधी खंदकाच्याही खाली खडकांमध्ये सरासरी चार मीटर खोलीपर्यंत मशीनद्वारे डीलिंग करून सिमेंट ग्राउंटीग करण्यात आले. यामुळे या खडकांमध्ये भेगा राहिलेल्या आहेत त्या भागामध्ये सिमेंट जाऊन बसते. त्यामुळे या धरणाची भिंत कायमस्वरूपी अभेद्य झाली असून आता पुढच्या अनेक वर्षांपर्यंत या धरणामधून पाणी लिकेज अर्थात पाण्याची गळती होणार नाही.जलयुक्तला ‘चांदा ते बांदा’ ची मदत देऊ : मुनगंटीवारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रापुढे ठेवलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. मौलझरी तलाव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कल्पक व धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण कायम असतो. हा प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी लढा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जलयुक्त शिवार योजनेतून या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी व परिपूर्णतेसाठी चांदा ते बांदा योजनेतूनही निधी दिला जाईल. हा प्रकल्प पुढच्या वर्षी आणखी पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल अशी, मला आशा असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.प्रयोगाला मान्यता मिळाल्याचा आनंद : सोनोनेया प्रकल्पाबद्दल बोलताना कार्यकारी अभियंता राजेश सोनोने यांनी अधिकाऱ्यांच्या प्रयोगशीलतेला कल्पक नेतृत्वाने पाठबळ दिल्याचा हा चमत्कार असल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे या जिल्ह्यांमध्ये काम करताना ही उपाययोजना सूचवली होती. यावर निधी कोठून खर्च करायचा आणि ही योजना यशस्वी होईल का, असा प्रश्न करून आपली बोळवण होत होती. मात्र पालकमंत्र्यांनी या प्रयोगावर विश्वास ठेवत पाठबळ दिल्याने आज सत्य पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.