शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचे पडसाद ! तांदूळ निर्यात ठप्प, धानाच्या भावात घसरण; शेतकरी दुहेरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:00 IST

Chandrapur : आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता भारतातील तांदूळ व्यापारावर उमटू लागले आहेत. निर्यात साखळी विस्कळीत झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची निर्यात ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता भारतातील तांदूळ व्यापारावर उमटू लागले आहेत. निर्यात साखळी विस्कळीत झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची निर्यात ठप्प झाली आहे. गेल्या आठवडाभरात एकही कंटेनर निर्यातीसाठी रवाना झाला नसल्याची माहिती आहे. निर्यात बंद पडल्याने राइस मिल आणि गोदामांमध्ये तांदळाची पोती पडून असून, त्याचा थेट फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात धानाचा प्रतिक्विंटल भाव २ हजार ३०० रुपयांवरून सुमारे २ हजार रुपयांपर्यंत घसरला असून, यात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

निर्यात ठप्प झाल्यामुळे गुजरातमधील बंदरे, मुंबईतील जे. एन. पोर्ट तसेच कोलकाता पोर्ट येथे हजारो क्विंटल तांदूळ तसाच पडून आहे. समुद्रमार्गे होणारी निर्यात मंदावल्याने निर्यातदारांनी खरेदी थांबवली असून व्यापारीही सावध झाले आहेत. ब्रह्मपुरी परिसरातील सहा राइस मिलमधून दररोज सरासरी पाच कंटेनर तांदूळ निर्यातीसाठी पाठविला जात होता. एका कंटेनरमध्ये सुमारे २७ टन तांदूळ यानुसार दररोज सुमारे १३५ टन तांदळाची निर्यात होत होती. हा तांदूळ प्रामुख्याने सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, रशिया तसेच इतर देशांमध्ये पाठविला जात असे. आखाती देशांमध्ये युद्ध भडकताच समुद्री मार्गावरील वाहतूक व निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आणि निर्यातीची साखळीच खंडित झाली. निर्यातदारांकडून खरेदी थांबली. व्यापाऱ्यांकडे तांदूळ साठून राहिल्यामुळे शेतकऱ्यांकडून धानखरेदीही मंदावली आहे.

बासमती तांदूळ व आयआर ६०/४० धानावर मंदी

इराण हा बासमती तांदळाचा मोठा आयातदार देश असून तेथील आहारात बासमती तांदळाला विशेष महत्त्व आहे. युद्धामुळे इराणकडे जाणारी निर्यात थांबल्याने बासमती तांदळाच्या किमतीत प्रतिक्विंटल सुमारे ५०० रुपयांची घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चंद्रपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणावर लागवड होणाऱ्या आयआर ६०/४० या धानालाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. निर्यात मंदावल्यामुळे या धानाच्या तांदळाच्च्या किमतीत सुमारे ३०० रुपयांची घट झाली आहे.

शासकीय खरेदी केंद्रांमध्ये ऑनलाइन नोंदणी झालेल्या धानाचे पैसेही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांत अद्यापि जमा झालेले नाहीत. एकीकडे बाजारातील दर घसरलेले आणि दुसरीकडे शासकीय देयकांमध्ये विलंब, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहेत.

"युद्धामुळे सध्याच्या परिस्थितीत व्यापारी धान खरेदी करण्यास तयार नाहीत. निर्यातदारांकडून मागणी थांबल्याने बाजारात मंदी आली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे."- प्रशांत उराडे, संचालक, साई प्रोडक्शन

English
हिंदी सारांश
Web Title : War Impact: Rice Exports Halt, Paddy Prices Fall, Farmers in Crisis

Web Summary : Gulf war disrupts rice exports, causing price drops. Farmers face losses as paddy rates fall from ₹2300 to ₹2000 per quintal. Basmati and IR 60/40 varieties suffer. Delayed government payments compound farmers' distress, creating a double bind.
टॅग्स :Warयुद्धFarmerशेतकरीfarmingशेती