स्वराज्य शेतकरी सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

By Admin | Updated: July 7, 2014 23:28 IST2014-07-07T23:28:50+5:302014-07-07T23:28:50+5:30

स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार

Warning of the movement of the Swarajya Shetkari Seva Sangh | स्वराज्य शेतकरी सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

स्वराज्य शेतकरी सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर : स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार असून न्याय हक्कासाठी तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वराज्य शेतकरी सेवा संघासोबत जुळारे, असे आवाहन संघाचे विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी केले आहे.
स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश करपे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. संजय अटकारे, प्रा. अनिल गर्गेलवार, जयपाल गेडाम, के. राजू आदींची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल उमेश करपे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून संघाची धुरा यशस्वीपणे पार पाडल्याबाबत विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करतांना उमेश करपे यांनी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. सध्या संघाच्या संघटन बांधणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम जोरात सुरु असून मोठ्या प्रमाणावर तरुण सहभाग होत असल्याने करपे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय अटकारे, प्रा. अनिल गर्गेलवार, जयपाल गेडाम, के. राजू यांनीही मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Warning of the movement of the Swarajya Shetkari Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.