अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:34+5:30

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करीत सेवा देत आहेत.

Waiting for incentive allowance for Anganwadi workers | अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

ठळक मुद्देग्रामपंचायतीतर्फे टाळाटाळ : कोरोना लढ्यातील यौद्धांवरच अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : कोरोनाच्या दहशतीत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना ग्रामीण विकास मंत्रालयाने एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत प्रोत्साहन अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा सामना करीत सेवा देत आहेत.
ग्रामीण विकास विभाग मंत्रालयाने यांच्या कामाची दखल घेत प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देन्याचा निर्णय घेतला. प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला पोहचली आहे. त्यानुसार ग्रामस्तरावर काम करणाºया काही कोरोना वारियर्सनां ग्रामपंचायतकडून प्रत्येकी एक हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले. तर काही ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना प्रोत्साहन मानधन देन्यास टाळाटाळ करीत आहे.

जीव धोक्यात घालून काम
बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांवर नजर ठेवणे, त्यांच्या घरी जावून चौकशी करणे, क्वारंटाईन करणे, आरोग्याविषयक माहिती घेणे, घरोेघरी जाऊन सर्व्हे करणे अशी विविध प्रकारची कामे त्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता करावी लागतात.

अपुºया मानधनांवर काम
अंगणवाडी सेविकांना अपुरे मानधन देण्यात येते. मागील अनेक महिन्यांपासून मानधन वाढीची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी त्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.

कोरोनाच्या लढ्यातील वारियर्सना प्रोत्साहन मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु, जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हेतु परस्पर प्रोत्साहन मानधन देत नाही. हा कोरोना वारियर्सवर अन्याय आहे.
-इमरान कुरेशी, जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

Web Title: Waiting for incentive allowance for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.