शेतकरी नाफेडच्या चना खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:31 IST2018-05-28T23:31:07+5:302018-05-28T23:31:20+5:30

हमी भावाने नाफेडने चना खरेदी करण्याकरिता एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात केवळ ३० शेतकऱ्यांचा चना खरेदी करुन नाफेडने तुर्तास चना खरेदी बंद केली आहे. खरेदीची अंतीम मुदत २९ मे असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे.

Waiting for farmers to buy Nafed gram | शेतकरी नाफेडच्या चना खरेदीच्या प्रतीक्षेत

शेतकरी नाफेडच्या चना खरेदीच्या प्रतीक्षेत

ठळक मुद्देसध्या खरेदी बंद : मंगळवारपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : हमी भावाने नाफेडने चना खरेदी करण्याकरिता एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात केवळ ३० शेतकऱ्यांचा चना खरेदी करुन नाफेडने तुर्तास चना खरेदी बंद केली आहे. खरेदीची अंतीम मुदत २९ मे असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे.
शेतकऱ्यांचा चना निघताच बाजारभाव घटले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला चना विकायचा असल्याने आवश्यक कागदपत्र देवून एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यामध्ये चना खरेदी नाफेडने सुरु करीत केवळ ३० शेतकऱ्यांची चना खरेदी हमी भावाने केली. त्यानंतर चना खरेदी बंद केली.
ती केव्हा सुरु होईल, याची माहिती नाफेडकडून मिळत नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. येत्या काही दिवसात शेतीचा हंगाम सुरु होत असल्याने हंगामाकरिता लागणाºया साहित्याची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे. घरात चना पडून आहे. खरेदीचा कुठलाही संदेश भ्रमणध्वनीवर पाठविला जात नाही. जास्त दिवस चना घरी राहिल्यास त्याची प्रतवारी खराब होण्याची शक्यता आहे. चना खरेदीची अंतीम तारीख २९ मे आहे.
एवढ्या कमी कालावधीमध्ये नाफेड चना खरेदी करु शकत नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहे. नाफेडने चना खरेदी केला नाही तर शेतीच्या हंगामात चुकारे मिळणार नाही,
हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला आपली रक्कम राहूनही सावकाराचे दार ठोठावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
चना खरेदीला तुरीची आडकाठी
नाफेडने खरेदी केलेली तूर बाजार समितीच्या आवारात सर्वत्र पडून आहे. तूर संथगतीने उचलली जात असल्याने चना खरेदीसाठी जागा शिल्लक नाही. चना खरेदी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे चना खरेदीला तुरीची आडकाठी आणल्याचे मानले जात आहे.

नाफेडला चना खरेदीला सहकार्य करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तुरीची उचल केली नाही, नोंदणी केलेल्या शेतकºयांचा चना नाफेड खरेदी करणार नाही तर त्याची सर्व जबाबदारी नाफेडकडेच असणार आहे.
- राजू चिकटे,
उपसभापती बाजार समिती वरोरा,

Web Title: Waiting for farmers to buy Nafed gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.