शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

मामा तलावांना सीमांकनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:50 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देअतिक्रमण वाढले : शेतकरी व प्रशासनात वाद

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात जि.प.च्या लघु सिंचन विभागाकडे १ हजार ६७८ मामा तलाव असून हे सर्व तलाव सीमांकनाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी या तलावांवरील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सिंचन क्षमता कमी होत आहे.१६ मे २०१६ च्या जल-१ या निर्णयानुसार या तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे शासनाने ठरविले आहे. यानुसार २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ४१४ तलावांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऊर्वरित कामे २०१९ पर्यत करण्यात येणार आहेत. असे असले तरी त्याअगोदर या तलावांचे सीमांकन होणे गरजेचे आहे. मात्र या तलावांचे सीमांकन करण्याची तसदी न घेता जि.प.च्या लघु सिंचन विभागाने तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम सुरू केले. तेच मुळ चुकीचे आहे, असे यासंदर्भात बोलले जात आहे.वास्तविक, सीमांकनाअभावी या तलावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अतिक्रमणामुळे मामा तलाव काही ठिकाणी आपले अस्तित्व हरवून बसले असून सिंचन क्षमता कमी झाली आहे. या अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक, गावकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष उद्भवल्याची उदाहरणे माहित असूनही जि.प या तलावांच्या सीमांकनाबाबत वेळ काढूपणाचे धोरण का अवलंबत आहे, हे एक कोडेच आहेसीमांकन करून तलावातील अतिक्रमण हटविल्यास पाण्याच्या संचय साठ्यात भर पडून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.प्रशासन व शेतकऱ्यांमधील वादही थांबतीललघु सिंचान विभागाकडे नसलेल्या पण जि. प. कडील एका विभागाच्या अखत्यारीतील मांगरूड आणि गोविंदपूर येथील तलावाच्या सीमांकनावरून नागभीड तालुक्यातच मोठे वाद उद्भवले होते. मांगरूड येथे तर उपविभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत वेस्ट वेअर फोडावा लागल्याची घटना मागील वर्षी घडली होती. हेच सीमांकन अगोदर झाले असते तर ही वेळ आली नसती.मोजणी शुल्क भरण्यासाठी निधीच नाहीमामा तलावांचे सीमांकन करण्यासाठी उपविभागीय कार्यालयांनी सबंधित भूमी अभिलेख कार्यालयांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. असे असले तरी भूमी अभिलेख कार्यालय मोजणी शुल्क प्राप्त झाल्याशिवाय सीमांकन करून देत नसल्याने येथेच लघु सिंचाई विभागाचे घोडे अडले आहे. मात्र मोजणी शुल्क अदा करायला लघु सिंचन विभागाकडे निधीच नाही.तलावाच्या पोटात झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार होत असलेले वाद लक्षात घेऊन या सर्व तलावांचे सीमांकन करणे गरजेचे आहे. यावर जि.प.च्या सभेत आपण प्रश्नही उपस्थित केला होता. या तलावांचे सीमांकन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार.- संजय गजपुरे, जि. प. सदस्य, चंद्रपूर .