सावरगाव शिवारात दोन बछड्यांसह वाघिणीचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST2021-09-02T04:59:07+5:302021-09-02T04:59:07+5:30
सावरगाव-वलनी महामार्गाच्या कडेला वनविभागाची रोपवाटिका आहे. यामध्ये लाकडांचा डेपोही आहे. लागूनच शेतशिवार व बोडी आहे. बो़डीशेजारील भागात अतिक्रमणधारकांची घरे ...

सावरगाव शिवारात दोन बछड्यांसह वाघिणीचा वावर
सावरगाव-वलनी महामार्गाच्या कडेला वनविभागाची रोपवाटिका आहे. यामध्ये लाकडांचा डेपोही आहे. लागूनच शेतशिवार व बोडी आहे. बो़डीशेजारील भागात अतिक्रमणधारकांची घरे आहेत. सद्यस्थितीत धानाचे पीक डोलत असल्याने पाणी देण्यासाठी शेतकरीवर्ग दिवसा, रात्री-बेरात्री शेतात जातात. दरम्यान, सावरगाव-वलनी येथील बऱ्याच शेतकऱ्यांना शेतात व डेपो परिसरात दोन मोठ्या बछड्यांसह वाघीण फिरताना दृष्टीस पडली आहे. अनेकांच्या शेतात वाघिणीच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. वाघीण बोडीमध्येही येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भीतीमुळे शेतकरी वर्ग दिवसाही शेतात जायला घाबरत आहेत. वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वलनी, सावरगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
माझे शेत वनविभागाच्या डेपोच्या आसपास आहे. मी दररोज शेतात जातो. मला शेताजवळील भागात वाघिणीचे दोन बछड्यांसह दर्शन झाल्याने अंगात धडकीच भरली. त्यामुळे शेतात जाण्याची हिंमत उरली नाही, शिवाय प्रत्यक्ष माझ्याच शेतात वाघिणीच्या पंजाचे ठसे आहेत.
- केवळराम लोणारे, शेतकरी, सावरगाव ता.नागभीड.