व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्ण झपाट्ट्याने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:26+5:30

नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

The virus caused a rapid increase in the number of colds and coughs | व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्ण झपाट्ट्याने वाढले

व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्ण झपाट्ट्याने वाढले

Next
ठळक मुद्देकोरोना झाला नसेल ना, ही सतावतेय भीती

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक दहशतीत असतानाही वातावरणातील बलामुळेही आरोग्यावर परिणाम पडत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात खोकला, ताप, साथीच्या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कोरोना तर झाला नसावा ना? अशी भीती प्रत्येकांच्या मनात घर करीत आहेत.
नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. 

थंड पदार्थ खाणे टाळा
आता हिवाळ्यातही आईसक्रीम, शितपेय सहज उपलब्ध होतात. अनेकजण ते मोठ्या आवडीने खातात. मात्र असे पदार्थ खाणे टाळावे त्यासोबतच आंबट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कामाशिवाय बाहेर पडू नये. अशा सूचना डाॅक्टरांनी दिल्या आहेत.

अनेकजणांना थंडीचे वातावरण सहन होत नाही. त्यामुळे उणी कापड्यांचा वापर करावा, विषाणूमुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे  बाहेर निघताना बचाव करावा, तसेच स्वत:ची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. 
- निवृत्तीनाथ राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय चंद्रपूर

Web Title: The virus caused a rapid increase in the number of colds and coughs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.