लग्नाच्या एक महिन्यापूर्वीच कुमारिकेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:41+5:302021-03-07T04:24:41+5:30

नीलिमा प्रमोद काकडे (रा. कांन्सा) असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीलिमाचे साक्षगंध झाले होते. एका ...

Virgin commits suicide a month before marriage | लग्नाच्या एक महिन्यापूर्वीच कुमारिकेची आत्महत्या

लग्नाच्या एक महिन्यापूर्वीच कुमारिकेची आत्महत्या

नीलिमा प्रमोद काकडे (रा. कांन्सा) असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीलिमाचे साक्षगंध झाले होते. एका महिन्यावर लग्न आले असताना तिने राहत्या घरीच स्वत: जाळून घेतले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे १० वर्षांपूर्वी वडील प्रमोद काकडे यांनीसुद्धा शेतात कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी अपघातात भावाचासुद्धा मृत्यू झाला. आई आता पोरीचा आधार घेऊन मोलमजुरी करून जगत असताना पोरीनेसुद्धा आत्महत्या केल्याने त्या मातेवर आभाळ कोसळले आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Virgin commits suicide a month before marriage