मुख्याध्यापकाने केले नियमांचे उल्लंघन

By Admin | Updated: August 19, 2015 01:25 IST2015-08-19T01:25:36+5:302015-08-19T01:25:36+5:30

येथून जवळच असलेल्या परसोडी (तुकूम) येथील हनुमान मंदिराजवळील चौकात १५ आॅगस्टला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

Violation of rules made by the headmaster | मुख्याध्यापकाने केले नियमांचे उल्लंघन

मुख्याध्यापकाने केले नियमांचे उल्लंघन

मेंडकी : येथून जवळच असलेल्या परसोडी (तुकूम) येथील हनुमान मंदिराजवळील चौकात १५ आॅगस्टला ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सदर ध्वजारोहण येथील उपसरपंच राजेंद्र दुनेदार यांच्या हस्ते न करता येथील जिल्हा परिषद शाळेने शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती विद्या राऊत यांच्या हस्ते केले. हा प्रकार लोकशाही प्रतिनिधी नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप उपसरपंच राजेंद्र दुनेदार यांनी केला आहे.
रामपुरी गटग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र दुनेदार हे दरवर्षी १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला पडसोडी (तुकूम) येथील चौकातील ध्वजारोहण नेहमीच करीत होते. परंतु जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.एच. मोटघरे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती विद्या राऊत या दोघांनी संगणमत करून ध्वजारोहण उपसरपंच यांच्या हस्ते न करता मुख्याध्यापक आर.एच. मोटघरे यांच्या पुढाकारातून हेतुपुरस्सर शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती विद्या राऊत यांच्या हस्ते केले.
या प्रकारामुळे गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार लोकशाही प्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारा आहे असल्याची दुनेवार यांची तक्रार आहे. राजेंद्र दुनेदार हे उपसरपंचपदावर कार्यरत असताना शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती विद्या राऊत यांना ध्वजारोहण करण्याचा अधिकार कुणी दिला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.एच. मोटघरे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सभापती विद्या राऊत यांची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच राजेंद्र दुनेदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. यावर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Violation of rules made by the headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.