‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:52+5:30

गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला.

Villagers' eyes grieved over the death of 'those' close friends | ‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

‘त्या’ जिवलग मित्रांच्या मृत्यूने पाणावले गावकऱ्यांचे डोळे

googlenewsNext
ठळक मुद्देगोवरीत शोककळा । गावात पेटल्या नाही चुली

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : मृत्यू हे आयुष्यातले अंतिम सत्य आहे. मृत्युला कुणालाही नाकारता येत नाही. मात्र, अकाली नको, ही मानवाची इच्छा असते. येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातात अकाली बळी गेल्याने चितेकडे पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले. शुक्रवारी गावात कुणाचीही चूल पेटली नाही.
गोवरी येथील संतोष रामकिसन लांडे (२७) व प्रीतम श्रीहरी परसुटकर (२५) या दोन जिवलग मित्रांचा दुचाकी अपघातातमृत्यू झाला. सकाळी हसत-खेळत आनंदी असणारे दोन्ही चेहरे अचानक कायमचे निघून गेले. गावात निधनाची वार्ता धडकताच स्मशान शांतता पसरली. दुसºया दिवशी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान एकाच रूग्णवाहिकेतून दोघांचेही शव गावात आणल्यानंतर अनेकांनी एकच हंबरडा फोडला. वृद्धापकाळात आपल्या भावासोबत आईवडिलांचा आधार ठरणारे दोन युवक जीव कायम नजरेआड झाल्याने गावकºयांनी अन्नालाही शिवले नाही. संतोष लांडे या युवकाचा १२ एप्रिल २०२० रोजी विवाह ठरला होता. त्यामुळे संतोषच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. भावी जोडीदारासोबत आयुष्याची स्वप्ने रंगवित संतोषही आनंदाने घराची कामे करीत होता. घरात सर्वत्र आनंदी वातावरण होते. प्रीतम परसुटकर नुकताच मार्केटिंगचे काम करणाºया एका खासगी कंपनीत कामाला लागला होता. घरी आईवडिलांना आधार व्हावा म्हणून तोही मोठ्या जिद्दीने कामे करायचा. लहानपणी एकाच अंगणात खेळणाºया या दोन जिवलग मित्रांना आपण एकाच वेळेस दोघेही जगाचा निरोप घेणार असा विचारही कधी शिवला नसावा? मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
संतोष हा स्वत:च्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करून घराकडे परतत असताना आणि प्रीतम गावाकडून राजुरा येथे काही कामानिमित्त जात असताना अचानक नियतीने डाव साधला.
दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोनही जिवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच येथे शोककळा पसरली. गावात काही घरी चूली पेटल्या नाही. नियतीने एवढा जबरदस्त आघात कुटुंबियांवर केला की त्यांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. दोन मित्रांचे अकाली जाणे मनाला कायमचे चटका लावून गेले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या दोन्ही मित्राने कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पेटलेल्या चितेकडे गावकºयांना हुंदके आवरता आले नाही.

Web Title: Villagers' eyes grieved over the death of 'those' close friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.